पुणे : बांगलादेशातून आणलेल्या अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याच्या गंभीर प्रकरणात बुधवार पेठेतील संबंधित कुंटणखाना तीन वर्षांसाठी सील करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील एका अल्पवयीन मुलीला दलालांनी चांगले काम देण्याचे आमिष दाखवून भारतात आणले. बेकायदेशीर मार्गाने देशात घुसखोरी केल्यानंतर तिला बुधवार पेठेतील एका कुंटणखान्यात ठेवण्यात आले. तिथे तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. या पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बबिता महम्मद शबीर शेख (वय ६१, रा. बुधवार पेठ) आणि चंपा ऊर्फ विष्णुमाया दिनेश लामा (वय ५१, रा. नवीन बिल्डिंग, बुधवार पेठ, मूळ रा. नेपाळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.