सुवर्णा कांचन, सकाळ वृत्तसेवा
उरुळी कांचन : तलवारीचा धाक दाखवत चार चोरट्यांनी महिलेच्या घरातील रोख रक्कम आणि १३ लाखांहून अधिक सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत कमल विश्वंभर डोईफोडे (वय ७०, मूळ रा. विश्वकमल बंगला, आंबेकर वस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली, सध्या. रा. मुंबई) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चार चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.