esakal | Pune: थेऊर रस्त्यावरील खड्ड्यांचे ‘मीम्स’ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

थेऊर रस्त्यावरील खड्ड्यांचे ‘मीम्स’ व्हायरल

पुणे : थेऊर रस्त्यावरील खड्ड्यांचे ‘मीम्स’ व्हायरल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) रस्तावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता असा प्रश्‍न वाहनचालकांना पडला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेवर सध्या सोशल मीडियावर ‘मीम्स’ तयार करून खड्डे तसेच प्रशासनाची खिल्ली उडविली जात आहे. मीम्स्‌ना सोशल मीडियावर याला तरुणाचा मोठा प्रतिसाद मिळत असून, ते लाईक, शेअर, फॉरवर्ड केले जात आहेत.

रस्ता कोणताही असो तो नादुरुस्त झाल्यावर रस्त्यावर खड्डे पडले की यावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक टीकाही केली जाते. कारण दळणवळणाची साधने वाढल्याने रस्त्यांचा मोठा वापर होत आहे. एखाद्या खेडेगावाकडे जाणारा किंवा शहरातील विविध प्रभागातील जोडणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले की विविध पक्षाचे नेतेमंडळी, सत्ताधारी, विरोधक यावर टिकाटिप्पणी करून विविध प्रकारची राजकीय आंदोलने करतात.

हेही वाचा: धुळे : 'तो' मृत्यूदेह विधवा तरूणीचा, प्रेम संबंधातून खून

दरम्यान, थेऊर येथील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांसाठी एका व्यंग चित्राचा फोटो सध्या पूर्व हवेलीत मोठ्या प्रमाणात फार व्हायरल होत आहे. यामध्ये एक ज्योतिषी भविष्य सांगण्यासाठी बसलेला आहे. त्याच्याजवळ एक पोपट आहे. यावेळी त्या ठिकाणी एक व्यक्ती भविष्य सांगणाऱ्या ज्योतिष्याजवळ जातो व त्याठिकाणी असणाऱ्या पोपटाला विचारतो कि, ''थेऊर येथील रस्त्याचे काम कधी होणार? हे विचारताच पोपट मरण पावला. यावरून ज्योतिषी सांगतो कि, ‘ज्या प्रश्नाचे उत्तर ब्रम्हदेवाकडे नाही ते याला कशाला विचारले.’ या मीम्सची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहेत. हे मीम्स अनेकजण लाईक, शेअर, फॉरवर्ड केले जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियात हि पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

निवडणुका येतात त्या वेळी प्रत्येक पक्षाचे उमेदवार प्रामुख्याने यशवंत कारखाना व गणपती रस्त्याचा विषय घेऊन मते मागतात. मात्र, निवडणुका संपल्या कि, कारखाना व गणपती दोन्हीकडे दुर्लक्ष केले जाते. थेऊरसह परिसरातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेल. तसेच अष्टविनायाकापैकी एक गणपती असल्यामुळे राज्यातील येणाऱ्या भाविकांमुळे रोजगार निर्मिती होणार असून, आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. या रस्त्यावर रोजच अपघाताचे सत्र सुरू आहे. त्यामुळे चिंतामणीच्या चरणी एकच प्रार्थना आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांना रस्ते व कारखाना सुरू करण्याची सुबुद्धी देवो.

- मिथुन तारू, ग्रामस्थ, थेऊर (ता. हवेली)

loading image
go to top