PUNE: चोरट्यांनी फोडलं काळूबाईचं मंदिर, दीड तोळ्यांच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज केला लंपास

Kalubai Mandir Theft: काळूबाई मंदिर परिसरात ही मागील दोन आठवड्यापुर्वी ड्रोन ने घिरट्या घातल्या होत्या
PUNE: चोरट्यांनी फोडलं काळूबाईचं मंदिर, दीड तोळ्यांच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज केला लंपास

Ambegaon News: येथील काळुबाई मंदिरात आज गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून देवीच्या अंगावरील दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 40 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टिम मशीन असा एकूण सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

येथील रोडेवाडी (नाथनगर) येथे सविंदणे पोंदेवाडी शिवे वर काळुबाई मंदिर आहे आज गुरुवारी सकाळ साडेसात वाजता मंदिराचे पुजारी किसन नरवडे व गायकवाड बाबा पूजा करायला गेले असता दरवाजाचा कडी कोयंडा तोडून दरवाजा उघडलेला आढळला किसन नरवडे यांनी नितिन नरवडे यांना फोन करुन माहीती दिली.

PUNE: चोरट्यांनी फोडलं काळूबाईचं मंदिर, दीड तोळ्यांच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज केला लंपास
Chhatrapati Sambhajinagar Crime : घरफोड्यांचा धुमाकूळ; कुलूपबंद घरांतून नऊ लाखांचा ऐवज लंपास

खरेदी विक्री संघांचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, अमोल वाळुंज,सोमनाथ वाळुंज, बाळासाहेब कोरके, सुनिल नरवडे, आबा नरवडे यांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली लोखंडी खुटीने दरवाजाची कडी उचकटून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करुन देवीच्या अंगावरील दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 40 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टिम मशीन असा एकूण सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

PUNE: चोरट्यांनी फोडलं काळूबाईचं मंदिर, दीड तोळ्यांच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज केला लंपास
Alandi Crime : नवरदेवाची फसवणूक! पहिले लग्न लपवून नवरीने केले दुसरे लग्न

लोखंडी खुटी जागेवर सापडली आहे पारगाव कारखाना पोलिस स्टेशनला घटनेची माहीती दिल्याचे संदीप पोखरकर यांनी सांगितले.मागील तीन आठवड्यापासुन तालुक्याच्या पुर्व भागात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन च्या घिरट्या वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली असुन प्रशासन याबाबत कोणतीही अधिकृत स्पष्टता देत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असुन अलीकडच्या काही दिवसात ड्रोन ज्या परिसरात फिरले त्या परिसरात चोरीच्या घटना घडल्या आहेत काळूबाई मंदिर परिसरात ही मागील दोन आठवड्यापुर्वी ड्रोन ने घिरट्या घातल्या होत्या

PUNE: चोरट्यांनी फोडलं काळूबाईचं मंदिर, दीड तोळ्यांच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज केला लंपास
Nandurbar Crime: अवैध मटका व्यावसायिकांच्या मुसक्या आवळल्या! नवापूर पोलिसांची 5 जणांवर कारवाई; आमलाण शिवारात रंगला होता डाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com