Thirty first : जल्लोष करा,पण जपूनच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thirty first parties

Thirty first : जल्लोष करा,पण जपूनच

पुणे : तरुणाईकडून ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन शहर व ग्रामीण पोलिसांकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. शहर पोलिस दलातील सुमारे तीन हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांचा कडक बंदोबस्त रस्त्यावर असणार आहे. याबरोबरच ठिकठिकाणी नाकाबंदी करून गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याबरोबरच मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाईदेखील करण्यात येणार आहे. ‘नागरिकांनी कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी, गैरप्रकार न करता नववर्षाचे उत्साहात स्वागत करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे. पोलिसांकडून लष्कर परिसर, विविध मॉल्स, हॉटेल्स, बसस्थानक, रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळे अशा गर्दीच्या व संवेदनशील ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. याबरोबरच पोलिस अभिलेखावरून गुन्हेगारांचीदेखील झाडाझडती घेण्यात येत आहे.

असे आहे नियोजन...

पोलिस ठाणे, वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचा ‘वॉच’

सोनसाखळी चोर, पाकीटमार यांच्यावर गुन्हेशाखेकडून ठेवला जाणार वचक

महिलांबाबत गैरकृत्य केल्याचे आढळल्यास होणार कडक कारवाई

हॉटेल, फार्महाउस आणि रिसॉर्ट मालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना

अतिरिक्त पोलिस आयुक्त

पोलिस उपायुक्त

सहायक पोलिस आयुक्त

४०

पोलिस निरीक्षक

१००

सहायक पोलिस निरीक्षक

२ हजार ५५०

पोलिस कर्मचारी

* बीडीडीएस पथके

* क्‍यूआरटी पथके

नववर्षाच्या स्वागतासाठी गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर अतिरिक्त पोलिस तैनात केले आहेत. कायद्याचा भंग केल्यास कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीदेखील आनंद साजरा करताना योग्य खबरदारी घ्यावी.

- अंकित गोयल,पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण

आक्षेपार्ह माहिती मिळाल्यास इथे साधा संपर्क

०२० २६१२६२९६

व्हॉट्सॲप क्रमांक ८९७५९५३१००

पोलिस नियंत्रण कक्ष - ११२