धनकवडीच्या आदर्श पतसंस्थेतील अपहारप्रकरणी व्यवस्थापकासह तिघांना अटक 

Three arrested for fraud in Dhankawadi Adarsh Patsanstha.jpg
Three arrested for fraud in Dhankawadi Adarsh Patsanstha.jpg
Updated on

पुणे : धनकवडीतील आदर्श नागरी पतसंस्थेमध्ये कोट्यावधी रुपयांच्या अपहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. व्यवस्थापक काशिनाथ केरबा जोगदंड, रोखपाल गौतम नाना जोगदंड (दोघेही रा. आंबेगाव पठार) व लिपीक शंकर सटवा जोगदंड (रा.धनकवडी) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.धनकवडी येथे आदर्श नागरी पतसंस्था आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारी संस्थेचे विशेष लेखा परिक्षक (वर्ग 1) विलास काटकर यांनी संबंधीत पतसंस्थेचे 26 डिसेंबर 1991 ते 20 जानेवारी 2018 या कालावधीतील चाचणी लेखा परीक्षण केले होते. त्यावेळी संबंधीत पतसंस्थेच्या संचालक व पदाधिकाऱ्यांनी अपहार करून पतसंस्थेतील ठेवींच्या रकमा परस्पर काढून त्याचा अपहार केल्याचे लेखा परिक्षणात आढळून आले होते. त्यामुळे संबंधीत आरोपींविरुद्ध सहकार कायद्यातील वैयक्तीक व सामुहिक जबाबदारीच्या तरतुदीनुसार, सुमारे 47 कोटी 9 लाख 81 हजार 758 रुपये इतक्‍या पैशांची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे यांच्याकडून केला जात होता. 

संबंधीत पतसंस्थेतील 161 गुंतवणुकदारांकडून तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. फसवणूकीची एकूण रक्कम सहा कोटी 78 लाख 52 हजार 180 इतकी आहे. पतसंस्थेतील कोट्यावधी रुपयांचा अपहार झाला. त्यावेळी व्यवस्थापक काशिनाथ जोगदंड, रोखपाल गौतम जोगदंड व लिपीक शंकर जोगदंड पतसंस्थेमध्ये कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळातच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे पोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांना न्यायालयासमोर हजर केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय कराळे, महिला पोलिस कर्मचारी अमृता हरबा, धनश्री सुपेकर, पोलिस कर्मचारी संदिप गिऱ्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com