

Dr. Jadhav Committee for Three-Language Policy
Sakal
पुणे : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समिती विभागनिहाय भेटी देऊन विविध घटकांशी संवाद साधत आहे. ही समिती गुरुवारी (ता. १३) पुणे दौऱ्यावर असून समितीचा जनसंवाद विधानभवन येथे सकाळी १० वाजता आयोजित केला आहे. यात संबंधित क्षेत्रातील अधिकाधिक घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी केले आहे.