धक्कादायक! कबुतर पिंजऱ्यात कोंडले म्हणून अल्पवयीन मुलावर केले कोयत्याने वार

In Pune three persons attacked a minor boy for pigeon
In Pune three persons attacked a minor boy for pigeon

पुणे : सोसायट्यांचे टेरेस , वाडे, चाळी, वस्त्यांमधील घरे असो, नाहीतर डोंगर, टेकडी. सध्या तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कोणतरी 50-100 कबुतरे पाळल्याचे चित्र तुम्हाला दिसेल. या कबुतरांमुळे तुम्हाला आजार होऊ शकतात इथपर्यंत ठिक होते, मात्र आता ही कबुतरे लोकांच्या जीवावर उठण्यास कारणीभुत ठरल्याचे वास्तव आहे. कारण घराच्या टेरेसवर बसलेले कबुतर पकडून पिंजऱ्यात ठेवल्यामुळे एका अल्पवयीन मुलावर तिघांनी थेट कोयत्याने वार करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी पावणे पाच वाजता वडगाव बुद्रुक येथे घडला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वडगाव बुद्रुकमधील जाधवनगर येथे फिर्यादी 16 वर्षीय मुलगा त्याची आई, भाऊ व आजीसोबत राहतो. अल्पवयीन मुलगा दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. फिर्यादीच्या घराजवळील परिसरामध्ये एका मुलाने कबुतरे पाळली आहेत. एक महिन्यापुर्वी त्याच्याकडील कबुतरांपैकी एक कबुतर अल्पवयीन मुलाच्या घराच्या टेरेसवर येऊन बसले. त्यावेळी अल्पवयीन मुलाने ते कबुतर पकडून पिंजऱ्यामध्ये ठेवले. दरम्यान, हा प्रकार कबुतरे पाळणाऱ्या मुलाने पाहीला. त्यावेळी त्याने त्याच्या मित्रासमवेत येऊन अल्पवयीन मुलास शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली होती. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, बुधवारी दुपारी पावणे पाच वाजता अल्पवयीन मुलगा हा त्याच्या दोन मित्रांसमवेत रायगडनगरमधील एका पडक्‍या घरामध्ये मोबाईलवर खेळत बसले होते. त्यावेळी कबुतरे पाळणारा मुलगा हा त्याच्या दोन साथीदारांसमवेत तेथे आला. त्याने एक महिन्यापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. "तुला काय माज आलाय का ? माझे कबुतरे पकडतोस काय? अशा शब्दात अल्पवयीन मुलाला धमकाविण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीच्या हात, मनगट, पायावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या मित्रांनी प्रयत्न केले, मात्र तिघांनी त्याच्या मित्रांनाही मारहाण केल्याने ते घाबरून पळून गेले. काही वेळाने हा प्रकार पाहून तेथील नागरीक जमू लागले. त्यावेळी संशयित आरोपींनी तेथून पळ काढला. दरम्यान जखमी अवस्थेतच त्याच्या मित्राने त्यास खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक ए.बी.काळे करीत आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited By : sharayu kakade)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com