

Bhavani Peth Timber Market Fire Destroys Homes and Lifelong Savings of Several Families in Pune
sakal
पुणे: भवानी पेठेतील टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीनंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. १९) लाकडी साहित्याचा ढिगारा, वाकलेले पत्रे आणि राडारोडा जेसीबी व टेंपोच्या साहाय्याने उचलण्याचे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. दरम्यान, खडक पोलिसांनी आगीच्या घटनेची नोंद केली आहे. पोलिसांकडून पंचनाम्याचे काम सुरू असून, नेमके किती नुकसान झाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.