

Bhavani Peth Timber Market Fire Destroys Homes and Lifelong Savings of Several Families in Pune
sakal
घोरपडी: रात्रीच्या गाढ झोपेत असताना अचानक कानावर पडलेली ‘आग लागली’ची आरोळी, क्षणार्धात घराभोवती आवळला गेलेला आगीच्या ज्वाळांचा विळखा आणि जीव वाचविण्यासाठी अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडलेली कुटुंबे... भवानी पेठेतील टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीत केवळ दुकानेच जळाली नाहीत, तर अनेक कष्टकरी कुटुंबांचे संसार आणि उद्याची स्वप्नेही क्षणार्धात राख केली.