
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात १ हजार बस दाखल होणार असून, याचा निर्णय आज (ता. १३) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये ५०० बस खरेदीसाठी पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका निधी देणार आहे. तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) स्वतंत्रपणे ५०० बस घेतल्या जाणार आहे. संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे.