

Maharashtra Government Plans Massive Underground Tunnel Network in Pune City
sakal
पुणे : शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाताल लोक प्रकल्पांतर्गत ५६ किलोमीटरचे पाच बोगदे तयार केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका स्वतंत्र ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (एसपीव्ही) कंपनी स्थापन करणार असून, प्राथमिक अहवाल आठ दिवसांत राज्य सरकारला सादर केला जाईल.