
Pune Traffic
Sakal
पुणे : शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरातील सुमारे ५०० सिग्नल जंक्शनवर ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ११०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तीन महिन्यांत अंमलबजावणी सुरू होईल. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.