
Pune Grand Challenge
Sakal
कोथरूड : ‘टूर डी फ्रान्स’ या सर्वाधिक लोकप्रिय सायकल स्पर्धेच्या धर्तीवर जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने जानेवारी २०२६ मध्ये पुणे शहरात ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुणेकर व सायकलप्रेमींसाठी ही अभिमानाची बाब असली तरी शहरातील सायकल मार्गांचा गैरवापर आणि त्यामुळे झालेली त्यांची दुरवस्था ही बाब अत्यंत लाजिरवाणी असल्याने सर्व सायकल मार्ग वापरण्यायोग्य करावे, अशी मागणी सायकल प्रेमींनी केली आहे.