PMPML Bus: डबलडेकरचा प्रायोगिक ‘प्रवास’; ‘आयटी पार्क’ परिसरात मार्गांचे लवकरच होणार सर्वेक्षण
IT Park Bus: पीएमपी प्रशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील आयटी पार्क परिसरात डबलडेकर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात डबलडेकरच्या काही बसांच्या माध्यमातून या सेवेची सुरुवात होईल.
पुणे : गेल्या तीन वर्षांपासून पीएमपीत दाखल होणाऱ्या ‘डबलडेकर’चा रखडलेला ‘प्रवास’ आता नव्याने सुरू होत आहे. पीएमपी प्रशासनाने पुणे व पिंपरी चिंचवड येथील आयटी पार्क असलेल्या परिसरात ‘डबलडेकर’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.