
पुणे : पुण्याहून लवकरच आणखी एक ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू होणार आहे. पुणे-नागपूर (अजनी) वंदे भारत एक्स्प्रेसवर रेल्वे बोर्डाने शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती रेल्वे बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे अवघ्या १२ तासांत पुणे ते नागपूरचा प्रवास होणार आहे. ही गाडी या मार्गावरील सर्वांत वेगवान रेल्वे ठरणार आहे.