Pune : टोमॅटोचा शेतातच झाला 'लाल चिखल' ; बाजारभाव कोसळले त्यातच पावसाने झोडपले ; नफा-तोटा दूरच वाहतूक खर्चही मिळेना

साधारण दिड ते दोन महिन्यांपूर्वी सफरचंदापेक्षा जादा दर म्हणजेच १५० ते २०० रूपये प्रति किलो जाणारे
tomato
tomato sakal

सागर रोकडे

पाबळ - 'शेतकरी राजा' नेहमीच कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाने अडचणीत सापडतो. गेल्या तीन- चार दिवसांत शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील आमदाबाद, कवठे येमाई, सविंदणे परीसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. टोमॅटोचा शेतातच लाल चिखल होण्यास सुरुवात झाली आहे.

साधारण दिड ते दोन महिन्यांपूर्वी सफरचंदापेक्षा जादा दर म्हणजेच १५० ते २०० रूपये प्रति किलो जाणारे

टोमॅटो आज प्रति क्रेट सरासरी ७५ ते ८० रुपये दराने विक्री करावे लागत आहे. असल्याचे शेतकरी गंगाधर जगताप यांनी सांगितले. यापूर्वी सुरूवातीला पावसाने ओढ दिल्याने दर जास्त मिळाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लागवड वाढल्याचे चित्र आहे. सध्या बाजार समितीत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. वाढलेली आवक व घटलेल्या मागणीमुळे दर कोसळले. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

बाजारभाव कोसळले, त्यातच पावसाने झोडपले

बाजारात टोमॅटोची होणारी विक्रमी आवक शेतकऱ्यांच्या अक्षरश: मुळावर उठली आहे. त्यामुळे दर कोसळले आहेत. पावसाने ओढ दिल्याने सुरूवातीला टोमॅटोला १५० ते २०० रुपये प्रति किलो पेक्षा जास्त बाजारभाव मिळाला. आपल्याला चांगला बाजारभाव भेटलं व बक्कळ पैसा मिळेल. या भोळ्याभाबड्या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली. नफा-तोटा भांडवल,

tomato
Pune News : पुणे जिल्ह्यात ‘एक तास स्वच्छतेचा’ उपक्रम; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

मजुरी दूरच माल घेऊन बाजार समितीत जाण्या-येण्याचा खर्चदेखील निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजार समितीत न नेता शेतातच जागेवर सोडून दिले आहे. तर काही शेतकरी जवळच्या आठवडे बाजारात नेऊन थोडा फार पैसा मिळवत होते. अगोदरच टोमॅटोला बाजारभाव नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यातच गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने प्रचंड मेहनत व भरमसाट पैसे खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोचा शेतातच लाल चिखल झाला. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

tomato
Nagpur : रेल्वेतील मृतांचे डीएनए सुरक्षित !

"टोमॅटोच्या एका कॅरेटला केवळ सरासरी ७५ ते ८० रूपये बाजारभाव मिळत आहे. लाखो रुपये भांडवल खर्च करून नफा दूरच वाहतूक खर्चही मिळत नाही. त्यातच पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी."

गंगाधर जगताप टोमॅटो उत्पादक शेतकरी

"पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे स्थळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पंचनामे करण्याचे काम सुरू आहे."

बाळासाहेब म्हस्के तहसीलदार शिरूर

tomato
Chh. Sambhaji nagar : पाणीटंचाईतून सुटका उन्हाळ्यातच ; नव्या योजनेतील नऊ जलकुंभ महापालिकेला मिळणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com