पुणे : सनदशीर मार्ग संपले; आता आंदोलन तीव्र करणार

व्यापारी महासंघाचा राज्य सरकारला इशारा
पुणे : सनदशीर मार्ग संपले; आता आंदोलन तीव्र करणार

पुणे : निर्बंध शिथिल करणे म्हणजे केवळ व्यापाऱ्यांचा फायदा नाही तर, नागरिकांचीही गरज आहे. त्यामुळेच व्यावसायिकांच्या आंदोलनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. राज्य सरकारने (maharashtra government) दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर, सोमवापासून दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी ठेवली जातील, असे पुणे व्यापारी महासंघाने शुक्रवारी स्पष्ट केले. (pune traders association opposed covid restriction)

दुकाने ४ ऐवजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी मिळावी, यासाठी पुणे व्यापारी महासंघ गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. तसेच दुकानदार आणि हॉटेल्सही शहर आणि उपनगरांत रात्री आठपर्यंत उघडी ठेवण्यात येत आहेत. या बाबत शुक्रवारी होणाऱ्या कोरोनाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवार निर्णय घेतील, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हटले होते. परंतु, ही बैठकच आता दोन दिवस लांबली आहे. त्यातच महात्मा फुले मंडईत आंदोलनादरम्यान एका व्यापाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला म्हणून विश्रामबाग पोलिसांनी तब्बल ३० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळेही व्यापारी संतप्त झाले आहेत. पुणे व्यापारी महासंघाने गेल्या दोन दिवसांत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याही भेटीगाठी घेतल्या. त्यांनीही शुक्रवारच्या बैठकीत दिलासा देऊ, असे आश्वासन दिले. परंतु, त्या बाबत कार्यवाही झालेली नाही.

या पार्श्‍वभूमीवर पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद रांका म्हणाले, ‘‘कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे पुण्यातील निर्बंध मुंबईच्या धर्तीवर शिथिल करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही शांततापूर्ण मार्गांनी आंदोलन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा केली. आता या पुढे आम्ही काय करणार ? आंदोलन करणे आमच्या हातात आहे, ते आम्ही करणारच. दोन दिवसांत निर्णय न झाल्यास सोमवारपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत.’’ शहरात सध्या विकेंड लॉकडॉऊन आहे, त्याची अंमलबजावणी आम्ही करू. त्यानुसार शनिवार- रविवारी नियमांची अंमलबजावणी करणार आहोत. परंतु, सोमवारपासून आंदोलन सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे : सनदशीर मार्ग संपले; आता आंदोलन तीव्र करणार
पुणे : धरणे, कालवे परिसरात २० टक्के बांधकाम करण्यास परवानगी

मॉल व्यावसायिकांचे आंदोलन

कोरोनाच्या निर्बंधांतून मॉल्स व्यावसायिकांना वगळले नसल्याच्या निषेधार्थ हडपसरजवळील ॲमनोरा मॉल्समध्ये शुक्रवारी दुपारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यात सुमारे २०० कर्मचारी, व्यावसायिकांनी भाग घेतला. पुण्यात सुमारे २० मोठे मॉल्स असून त्यावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे ७६ हजार नागरिकांचा रोजगार अवलंबून आहे. या व्यवसायात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने मॉल्स उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी या प्रसंगी शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य सुरजितसिंग राजपुरोहित यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com