
Pune Traffic
Sakal
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याचे वर्गीकरण गेल्या आठ वर्षांपासून रखडले आहे. प्राधान्याने करण्यात येणाऱ्या ५० मीटर रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने २७० कोटी रुपये उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील २२० कोटी रुपये हे वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून दिले आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला.