
कात्रज : सुखसागरनगरकडून अप्पर डेपोकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्याचे अक्षरशः हाल झाले आहेत. अप्पर श्रमिक चौकातील नवीन पाण्याच्या टाकीला २४X७ अंतर्गत पाईप जोडण्याचे काम जानेवारी महिन्यापासून सुरू आहे. हे काम अत्यंत संथ गतीने करण्यात आले. त्या कामासाठी रस्ता खोदल्यानंतर ड्रेनेज विभागाने मलनिसःरण वाहिनी टाकण्याचे काम सुरु केले. दोन्ही विभागाकडून संथ गतीने काम करण्यात आल्याने मागील काही दिवसांपासून खोदकाम करुन ठेवण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.