Pune Traffic Viral Video: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर शुक्रवारी सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे विकेंडपूर्वीच पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. सिंहगड रोड, वारजे वडगाव भागात वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. राजाराम पुलावर देखील मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. जवळपास 1 ते दीड तास लोक रस्त्यावर अडकून पडले होते.