
Pune Traffic App
Sakal
पुणे : पुणे ट्रॅफिक ॲपद्वारे (पीटीपी ॲप) तुम्ही स्वतः बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई घडवून आणू शकता. फक्त कोणी नियम मोडत असल्याचे छायाचित्र घ्या, ॲपवर अपलोड करा आणि पुढची जबाबदारी वाहतूक पोलिसांची! या ॲपच्या माध्यमातून नागरिकांनी आतापर्यंत ४२ हजार सातशे तक्रारी नोंदविल्या असून, त्यापैकी ३२ हजारांहून अधिक जणांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.