अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात दोन दिवस वाहतूक बदल

अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त
पुण्यात दोन दिवस वाहतूक बदल
Published on: 

पुणे, ता. १४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त रविवारी (ता. १५) आणि सोमवारी (ता. १६) शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव विविध मार्गांवर ‘नो पार्किंग झोन’ राहणार असून, अवजड वाहनांना बंदी घातली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनी, जिल्हा परिषद, नेहरू मेमोरियल हॉल, जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेल आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या ठिकाणी दौऱ्यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

दोन्ही दिवस ‘नो पार्किंग’ रस्ते :
- टेक्निकल एअरपोर्ट ते विमाननगर, रामवाडी, एबीसी चौक ते भारत फोर्ज कंपनी.
- नॉर्थ मेन रस्ता, जहाँगीर चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक ते बोपोडी हॅरिस पूल.
- संचेती चौक, गणेशखिंड रस्ता ते सेनापती बापट रस्ता.
- इंजिनिअरिंग कॉलेज चौक, शाहीर अमर शेख चौक, जिल्हा परिषद ते नेहरू मेमोरियल चौक.
- जंगली महाराज रस्ता, लोकमान्य टिळक चौक ते टिळक रस्ता.
- फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, सिमला ऑफिस चौक, पाटील इस्टेट, संगमवाडी, सादलबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गोल्फ क्लब आणि ५०९ चौक ते टेक्निकल एअरपोर्ट.

सोमवारी (ता. १६) बदल व बंद रस्ते :
- सकाळी नऊपासून ‘नो पार्किंग’ : लोकमान्य टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही चौक, पेरूगेट चौकी, भरत नाट्य मंदिर ते भारत इतिहास संशोधक मंडळ.
- सकाळी सातपासून बंद रस्ते : किराड चौक ते नेहरू मेमोरियल हॉल चौक (पर्यायी मार्ग : जीपीओ किंवा ब्लू नाईल हॉटेल चौक) आणि दोराबजी मॉल ते ब्लू नाईल चौक.
- मान्यवरांसाठी वाहनतळ : एसजीएस मॉल, पूना क्लब, लेडीज क्लब, किराड चौक ते एसबीआय लेन आणि इस्कॉन मंदिर ते ब्लू नाईल चौक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.