पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्ग कोणते? खरेदीला गेल्यावर पार्किंग कुठे करायचं? वाचा सविस्तर अपडेट्स

Pune Traffic Update: पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. आजपासून पुढील तीन दिवस होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर काही मार्ग बंद ठेवण्यात आलेत तर काही ठिकाणी पार्किंग व्यवस्था तयार आलीय.
Pune Traffic

Pune Traffic

Esakal

Updated on

गणपती मूर्ती खरेदी आणि प्रतिष्ठापनेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत आजपासून ३ दिवसांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. १२, १३ आणि १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. शिवाजी रोडवरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. याशिवाय सिंहगड रोडवर सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर या मार्गावर पार्किंगला मनाई करण्यात आली आहे. केशवनगर-मुंढवा परिसरात काही मार्गांवर जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. गणपती मूर्ती खरेदीसाठी काही ठिकाणी विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com