पुणे : नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पाटील यांचा पाहणी दौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार  चंद्रकांत पाटील

पुणे : नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पाटील यांचा पाहणी दौरा

कोथरूड: उड्डाणपूल बांधुनही नळस्टाॅप चौक परिसरातील वाहतुक कोंडी सुटत नसल्याने भाजपाप्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मेट्रो व वाहतूक पोलिस, अधिकारी, माजी महापौर यांच्या उपस्थितीत पाहणी केली. कोणत्याही परिस्थितीत येथील वाहतूक कोंडी सोडवा अशा सुचना पाटील यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या. नव्या उड्डाणपूलामुळे नळस्टॉप चौकातील ७५ टक्के वाहतूक सुरळीत झाली असून, केवळ संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत कोथरुडकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यासाठी आमदार पाटील यांनी आज नळस्टॉप चौकाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.

यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, मनपा वाहतूक नियोजन विभागाचे श्रीनिवास बोनाला, मेट्रोचे गौतम बिऱ्हाडे, मनपा पथविभागाचे अभिजीत डोंबे, वाहतूक पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, कर्वे रोड व्यापारी संघाचे ओमप्रकाश रांका, राजू भटेवरा कोथरुड भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ उपस्थित होते.

दीर्घकालीन उपाययोजनेत बालभारती पौंड फाटा रस्ता झाल्यावर, कोथरूडकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. हे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाशी सतत संपर्कात आहोतच, मात्र तोपर्यंत नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी आज सर्व बाजूने विचार करुन अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. असे आमदार पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

* मेट्रोचे सर्वत्र पडलेले सामान व राडारोडा तातडीने उचलून रस्ता मोकळा करणे,

*पदपथ सुस्थितीत करणे,

*शक्य तिथे रस्त्याचे रुंदीकरण करणे,

* बस आणि अवजड वाहने उड्डाणपुलावरुनच जातील अशी व्यवस्था करणे,

*वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या बस स्टॉपच्या जागा तातडीने बदलणे,

*नळस्टॉप चौकातील सिग्नलच्या वेळेचे नियोजन करणे, या उपाययोजना आगामी दहा दिवसांत करण्याच्या सूचना आ. पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

आमदार पाटील म्हणाले की, हा पुल पाडण्याची आवश्यकता भासणार नाही. या पुलामुळे सुविधा निर्माण झाली आहे. जड व हलकी वाहने एकत्र आल्याने कोंडी होत आहे. इतरही उपाय योजना सुचवल्या आहेत. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, विधी महाविद्यालय वाहने कर्वेरस्त्यावर येतात तेथे बाॅटलनेक तयार होतो. त्यामुळे कोंडी होते. बालभारती पौडरस्ता हे काम लवकर झाले तर ही अडचण सुध्दा दूर होईल.

पत्रकारांनी बोलताना आमदार पाटील म्हणाले की,

भाजपाची राष्ट्रपती राजवंश लागू करण्याची अधिकृत मागणी नाही. राष्ट्रपती राजवंश लागू करायची स्थिती निर्माण झाली की नाही याबद्दल राज्यपाल ठरवतील. ते राष्टपतींना कळवतील. लाख मारायचे आणि साॅरी म्हणायचे ही महाविकास आघाडीची वृत्ती आहे. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीला जाण्यासारखी परिसरातील ह्या लोकांनी ठेवली नाही. एकत्र बसण्यासाठी सिरीयसनेस दिसला पाहिजे. ज्या बैठकीत निर्णय होणार नाही तेथे जाण्यात अर्थ नाही. पोलखोलचा समारोप विक्रमी होईल लोक निवडणुकांमध्ये योग्य उत्तर देतील.