
पुणे शहरात येत्या गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. यंदा गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता मिळाल्याने उत्सवाची भव्यता आणि उत्साह दुप्पट झाला आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि आमदार हेमंत रासने यांनी शहरातील मध्यवर्ती भागात तयारीचा आढावा घेतला. यावेळी वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येवरही चर्चा झाली. आयुक्तांनी दीड वर्षात वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.