Pune Ranked 4th in Global Traffic Congestion : जगात अनेक मोठ्या शहरांमधील वाढती वाहतूककोंडी सर्वांचीच डोकेदुखी ठरली आहे. जगभरातील प्रत्येक मोठ्या शहरात वाहनांची संख्या वाढल्याने कमी अंतर कापण्यासाठी खूप वेळ लागतो. अशातच ‘टॉम-टॉम’ या डॅनिश संस्थेने जगभरात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आता समोर आला आहे. यामध्ये १० किलोमीटर हे अंतर कापण्यासाठी पुण्यात ३३ मिनिटं २२ सेकंद इतका अवधी लागत असल्याचे निरीक्षण या संस्थेने नोंदवले आहे.
यासंस्थेनुसार जागतिक वाहतूककोंडीत पुण्याचा चौथा क्रमांक लागला आहे. तर पहिल्या क्रमांकावर कोलंबियातील बरानकिला हे शहर आहे. तसेच दुसरा क्रमांकावर कोलकाता आणि तिसऱ्या क्रमांकावर बेंगळुरू शहर आहे.