
औंध : बाणेर, बालेवाडी आणि म्हाळुंगे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येमुळे येथील नागरिकांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः राधा चौक आणि राष्ट्रीय महामार्गाखालील पुलाजवळ दररोज कोंडी होते. या समस्येवर उपाययोजना करण्यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.