
पुणे : सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटकडे जाण्यासाठी शिवा काशीद चौक ते हिंगणेदरम्यानच्या उड्डाणपुलाचे अंतिम टप्प्यातील काम शिल्लक आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. १५) होणारा लोकार्पणाचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. त्याचा फटका राजभवन ते ई-स्क्वेअरदरम्यानच्या उड्डाणपुलाच्या लोकार्पणाला बसला आहे. हे दोन्ही उड्डाणपूल सुरू होण्यास आणखी किमान १० दिवस लागणार आहेत.