.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Traffic Diversions in Central Pune for Angaraki Sankashti Chaturthi
Sakal
पुणे : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंगळवारी (ता. २९) शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून गर्दी ओसरेपर्यंत हे बदल लागू राहतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या नियमांतून वगळण्यात आले आहे.