

Pune Traffic Update Swargate to Katraj Underground Metro Work Changes Traffic Routes Near Market Yard and Pune Satara Road
sakal
पुणे : स्वारगेट ते कात्रजदरम्यान भुयारी मेट्रो मार्गाच्या कामामुळे मार्केटयार्ड आणि पुणे-सातारा रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आले आहेत. या भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल सोमवारपासून (ता. १९) पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.