
२५ ते २७ ऑगस्टदरम्यान पुण्यातील शिवाजी रोड, डेंगळे पूल, सिंहगड रस्ता, केशवनगर, मुंढवा परिसरात वाहतुकीत बदल व काही रस्त्यांवर बंदी राहणार आहे.
पीएमपी बससाठी पर्यायी मार्ग देण्यात आले असून, शिवाजीनगर व मनपा बसस्थानकातून जाणाऱ्या बसेसना जंगली महाराज रस्ता व टिळक रस्त्याने वळवले जाईल.
गणेशभक्तांसाठी मंडई, शाहू चौक, नदीपात्रातील रस्ते यासह ठराविक ठिकाणी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाला बुधवारी सुरुवात आहे. पुण्यात दरवर्षीप्रमाणे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यादरम्यान गणेश प्रतिष्ठापना व मुर्ती खरेदी निमित्त शहरात गणेश भक्त व मंडळांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसह वाहतुकीची सोय सुरळीत राहावी यासाठी वाहतूक शाखेने विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान शहरातील डेंगळे पूल, पेठांचा भाग, सिंहगड रस्ता, केशवनगर, मुंढवा या परिसरातील काही मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आला आहे.