
Pune Traffic
Sakal
पुणे : वाहतूक नियमभंगाच्या सवलतीच्या दंडासाठी आलेल्या वाहनचालकांनी शुक्रवारी (ता. १२) येरवड्यातील वाहतूक शाखा कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी केली. सकाळपासूनच नागरिक रांगेत उभे राहिले होते. नागरिकांनी कार्यालयाबाहेर लावलेली रांग थेट विमानतळ रस्त्यापर्यंत पोहोचली होती. मात्र, केवळ ४०० ते ५०० नागरिकांनाच टोकन देण्यात आल्याने अनेकांना दंड भरता आला नाही. यामुळे रांगेत तासन्तास थांबलेल्या वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी होती.