
Pune Traffic
Sakal
पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रलंबित दंड जास्तीत जास्त सवलतीने भरण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीच्या नियोजनाचा शुक्रवारी (ता. १२) फज्जा उडाला होता. त्यानंतर शनिवारी (ता. १३) शिवाजीनगर न्यायालयात दंडाची रक्कम भरण्यासाठी शिवाजीनगर न्यायालयात गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी कोर्ट हॉलमधून खाली येत नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले.