
Garware bridge repair Pune
Sakal
पुणे : गरवारे पुलावर शुक्रवारी (ता. ३) दुपारी महत्त्वाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून, या कामाच्या पार्श्वभूमीवर दुपारी १ ते ४ या वेळेत काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन डेक्कन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.