
Pune Traffic News: पुणे शहरात सध्या वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेषतः शिवणे ते शिंदे पूल रस्त्यावर आणि नांदेड सिटी परिसरात सकाळच्या वेळी होणारी भीषण वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या समस्येमुळे दररोज हजारो नागरिकांचा वेळ वाया जात आहे. वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे आणि अपुऱ्या नियोजनामुळे ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे.