सातारा-पुणे महामार्गावरुन जाताय? मग थांबा! 'बकरी ईद'मुळे वाहतूक झालीये ठप्प; शिवापूर टोलजवळही वाहनांच्या लागल्या रांगा
Pune Traffic Jam : सातारा-पुणे महामार्गावरील (Satara-Pune Highway) अपूर्ण फ्लायओव्हर आणि शिवापूर टोल नाक्यावरील (Shivapur Toll Plaza) निकृष्ट दर्जाचे काम यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
पुणे : बकरी ईद (Bakari Eid) निमित्त आज पुण्यातील भोर, राजगड आणि साताऱ्यातील वाई, महाबळेश्वर या लोकप्रिय पर्यटनस्थळांकडे मुस्लिम समाजातील (Muslim Community) बांधव, शासकीय कर्मचारी तसेच अनेक पर्यटक मोठ्या संख्येने निघाले होते.