Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर अभुतपूर्व वाहतूक कोंडी; वाहनांच्या ६ किमीपर्यंत रांगा

Pune Traffic News: कालव्यालगतचा पर्यायी रस्ता आणि मुख्य सिंहगड रस्ता या सर्व भागात वाहतूक कोंडी होती. सकाळी साडेआठ पासून ते अकरा वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होती. कालव्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात गाड्या अडकल्या होत्या. यात रुग्णवाहिका देखील अडकल्या होत्या.
Pune Traffic News
Massive traffic jam on Pune's Sinhagad Roadesakal
Updated on: 

Traffic Jam on Pune Sinhagad Road: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूककोंडी झाली असून पुणेकरांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनस्तापाला सामोरे जावे लागले. पुणेकर या वाहतूक कोंडीत चार तास अडकून पडले. वाहनांच्या रांगा दूर-दूर पर्यंत लागल्या होत्या. कोथरूड कर्वेनगर कडे जाणारा राजाराम पुलाचा एक भाग देखभाल दुरुस्तीसाठी बंद केल्याने सिंहगड रस्त्यावर वाहतुकीचा बोजवारा उडाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com