
Pune Traffic
Sakal
राजेश कणसे
आळेफाटा : पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण आणि सुरू असलेले सिमेंट काँक्रिटीकरण तसेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक आळेफाटा मार्गे वळवल्याने शनिवारी मध्यरात्री पासुन पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आळेखिंड परिसरात तब्बल बारा तास प्रचंड वाहतूक कोंडी झालेली असल्याने वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर रांगा लागल्या होत्या.