
धायरी : मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरातील सेवारस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक झाली असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.