

Mohammedwadi Undri Road Congestion Worsens Narrow Road Potholes and Rising Traffic Leave Commuters Frustrated
esakal
-कृष्णकांत कोबल
हडपसर : महंमदवाडी–उंड्री रस्त्यावरील अरुंद रस्ता, उंच-सखल भाग आणि ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे यांमुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील केवळ पाचशे ते सहाशे मीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल अर्धा तास खर्च करावा लागत असून, दररोज सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.