वाहतूक कोंडीचा रात्री अक्षरशः कळस, वाहनचालक एक ते दिड तास वाहतूक कोंडी अडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune traffic news night traffic jam literally culminated driver stuck in traffic jam for 2 hours pune

वाहतूक कोंडीचा रात्री अक्षरशः कळस, वाहनचालक एक ते दिड तास वाहतूक कोंडी अडकले

पुणे : पावसामुळे शहरात दिवसभर वाहतूक विस्कळित असताना रात्री मात्र वाहतूक कोंडीने अक्षरशः कळस केला. डेक्कन, कर्वे रस्ता, गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर या प्रमुख रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे एक ते दीड तास वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची शिक्षा वाहनचालकांना मिळाली. त्यातून रुग्णवाहिका देखील सुटू शकल्या नाहीत. त्यामुळे वाहतूक पोलिस व महापालिका प्रशासनाची बेफिकिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.

शहरात रविवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर सोमवारी सकाळीही पाऊस सुरूच होता. परिणामी सोमवारी सकाळपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात वाहतूक विस्कळीत झाली होती. सायंकाळी तरी वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल, हि नागरिकांची अपेक्षा फोल ठरली. सायंकाळी सात वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने डेक्कन, कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता,भांडारकर रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, गणेशखिंड रस्ता, बाणेर, पाषाण, बावधन रस्ता, औंध रस्ता, खडकी, स्वारगेट येथे मोठ्या प्रमाणांत वाहतूक कोंडी झाली होती.

नळस्टॉप येथील दुहेरी उड्डाणपूलामुळे वाहतूक विस्कळत होण्यास आणखी भर पडली. त्यामुळे कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता,भांडारकर रस्ता, डेक्कन या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एकीकडे पाऊस व दुसरीकडे वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले होते. रात्री नऊ वाजता देखील औंधहून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकाकडे येणाऱ्या वाहनांच्या तर पाठीमागे केंद्रीय विद्यालयापर्यंत रांगा लागल्या होत्या. हिच परिस्थिती येरवडा, नगर रस्ता, खडकी या भागातही होती.

...आणि अर्धा तास कार्डीयाक रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली !

सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एक कार्डियाक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन औंधहून शिवाजीनगरला निघाली होती. मात्र ही रुग्णवाहिका केंद्रीय विद्यालयाजवळच वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती. रुग्णवाहिका चालकाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूनही कोंडीतून बाहेर पडता येत नव्हते. दरम्यान, काही नागरिकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात थांबलेले वाहतूक पोलिस तसेच चतु:शृंगी पोलिसांना माहिती देऊन रुग्णवाहिकेला मार्ग करून देण्याची विनंती केली.

Web Title: Pune Traffic News Night Traffic Jam Literally Culminated Driver Stuck In Traffic Jam For 2 Hours Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top