
Pune Traffic
Sakal
पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रलंबित दंड जास्तीत जास्त सवलतीने भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष लोक अदालतीत पहिल्याच दिवशी ५०० हून अधिक वाहनचालकांनी सवलतीचा फायदा घेत दंड भरला. यामुळे पहिल्याच दिवशी तीन हजाराहून अधिक चलने भरली होती. त्यातून १० लाखांहून अधिकचा महसुल जमा झाला आहे.