

"दारू पिऊन गाडी चालवताय? मग येरवड्यात समुपदेशनासाठी राहा तयार!" पुणे वाहतूक पोलिसांचा २२९ चालकांना धडा.
Sakal
पुणे : ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चे वाढते प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रत्येक शुक्रवार, शनिवार आणि रविवारी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलिसांनी २२९ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली असून, या चालकांचे सोमवारी (ता. १३) येरवडा येथील वाहतूक शाखेत समुपदेशन करण्यात आले.