201 Drunk Drivers Booked in Three Days
पुणे : अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी शहर वाहतूक शाखेने मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवत तीन दिवसांत २०१ मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई केली. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी ही माहिती दिली. शहर वाहतूक शाखेकडून मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत तीन दिवसांची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान शहरातील विविध भागांमध्ये एकूण ३० ठिकाणी नाकाबंदी पॉइंट उभारून वाहनचालकांची तपासणी करण्यात आली.