पुणे : अखेर शहरात अवजड वाहतुकीस बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune traffic police Finally ban heavy vehicle traffic in pune city

पुणे : अखेर शहरात अवजड वाहतुकीस बंदी

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातून सकाळी 6 ते रात्री अकरा या वेळेत अवजड वाहतुक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश वाहतूक शाखेच्या वतीने शुक्रवारी रात्री उशिरा काढण्यात आला. शहरात मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडण्यापासून ते जीवघेणे अपघात हि होऊ लागले आहेत. कर्वे रस्त्यावर एका सिमेंटच्या मिक्सरची धडक बसून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या पार्श्भूमीवर, शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती.

अखेर शुक्रवारी रात्री उशिरा वाहतूक शाखेच्या वतीने जड, अवजड, मंदगती वाहनांना वाहतुक व पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचा आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी काढला.

• या रस्त्यांवर असेल अवजड वाहनांना बंदी

- छत्रपती शिवाजी महाराज रस्ता - स.गो.बर्वे चौक ते जेधे चौक

- गणेश रस्ता - जिजामाता चौक ते दारूवाला पुल

- लक्ष्मी रस्ता - संत कबीर चौक ते टिळक चौक

- टिळक रस्ता - जेधे चौक ते टिळक चौक

- लाल बहादूर शास्त्री रस्ता - दांडेकर पूल ते टिळक चौक

- केळकर रस्ता - टिळक चौक ते अप्पा बळवंत चौक

- कुमठेकर रस्ता - टिळक चौक ते शनिपार चौक

- शनिपार मंडई रस्ता - रामेश्वर चौक ते शनिपार चौक

- विर संताजी घोरपडे पथ - गाडगीळ पुतळा ते शाहीर अमर शेख चौक

- बाजीराव रस्ता - पूरम चौक ते शिवाजीनगर, सिमला ऑफिस

- - गणेशखिंड रस्ता - सुभाषचंद्र बोस चौक (संचेती रुग्णालय) ते राजीव गांधी पुल, औंध

- लक्ष्मीनारायण रस्ता - व्होल्गा चौक ते मित्रमंडळ चौक ते सावरकर चौक

- नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड)-

सावरकर चौक से धायरी

- कर्वे रस्ता - खंडूजीबाबा चौक ते वनदेवी चौक

- पौड रस्ता - पौड फाटा ते चांदणी चौक

- फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता - खंडूजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक

- विधी महाविद्यालय रस्ता - नळस्टॉप चौक ते वि.स.खांडेकर चौक

-सेनापती बापट रस्ता

वि. स. खांडेकर चौक ते सेनापती बापट रस्ता जंक्शन

- नेहरू रस्ता - कृष्णराव ढोले पाटील चौक (सेव्हन लव्ह चौक) ते मालधक्का चौक

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर रस्ता - सुभाषचंद्र बोस चौक ते आंबेडकर पुतळा.

- महात्मा गांधी रस्ता - गोळीबार मैदान चौक ते आंबेडकर पुतळा, लष्कर परिसर

- ईस्ट स्ट्रीट - खान्या मारुती चौक ते इंदिरा गांधी चौक, लष्कर परिसर

- जंगली महाराज रस्ता - स.गो.बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक