
Summary
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर बस चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला.
वाहतूक पोलिस अधिकारी अर्चना निमगिरे आणि रमेश धावरे यांनी तत्परतेने सीपीआर देऊन त्यांचा जीव वाचवला.
गर्दीच्या ठिकाणी मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.
पुणे शहरातील गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यावर वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. दोन वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी एका पीएमपीएमएल बस चालकाचा जीवही वाचवला आणि मोठी दुर्घटनाही टाळली. यामुळे त्या अधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.