Pune Traffic : पुणेकर अडकले वाहतूक कोंडीत; देशात सातव्या क्रमांकावर

वाहतुकीचा वेग सर्वाधिक संथ असणाऱ्या शहरांच्या यादीत देखील पुण्याचा २०वा क्रमांक
traffic jam in Hadapsar due to closure of flyover traffic pune police
traffic jam in Hadapsar due to closure of flyover traffic pune policesakal

पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या आता नवीन राहिलेली नाही. पुणेकर वाहतूक कोंडीमुळे वैतागलेले आहे. देशामध्ये वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा सातवा क्रमांक लागतो. त्यामुळे आता राज्य सरकारने याबद्दल अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य सरकारच्या सूचनेनंतर पुणे शहरातील वाहतूककोंडीचा अभ्यास मुंबई आयआयटी करणार आहे. वाहतुकीचा वेग सर्वाधिक संथ असणाऱ्या शहरांच्या यादीत देखील पुण्याचा २०वा क्रमांक असल्याचं आढळून आलं आहे.

traffic jam in Hadapsar due to closure of flyover traffic pune police
Pune Crime : जादूटोण्यासाठी महिलेचं मासिक पाळीचं रक्त विकलं; नक्की काय झालं? पोलीस म्हणाले...

गेल्या काही महिन्यांपासून पुणेकर वाहतूककोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत पुणेकरांना शहराच्या अनेक भागात वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी आणि त्यावर अभ्यास करण्याचे आदेश राज्य सरकारने आयआयटी मुंबईला दिले आहेत

traffic jam in Hadapsar due to closure of flyover traffic pune police
Budget 2023 : जातीशिवाय खत नाही; सांगलीतल्या प्रकारावर CM शिंदे म्हणाले, "केंद्राला कळवतो..."

वाहतूक कोंडीबाबत मंत्रालयामधील अधिकारी, आयआयटीचे प्रतिनिधी आणि पुणे महापालिका आयुक्त यांच्यात काल एक बैठक पार पडली. गेल्या ५-६ वर्षात पुणे शहरातील वाहतुकीत काय बदल करण्यात आले. याचा विचार करून वाहतूककोंडीच्या समस्येचा अभ्यास करावा. तसेच याबाबत अहवाल तयार करावा अशी सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com