

Proposed 45 km Underground Road Network
Sakal
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अहिल्यानगर, सोलापूर, सातारा आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग अशा चारही महामार्गांना जोडणारा सुमारे ४५ किलोमीटर लांबीचा भूमिगत रस्त्याचा पर्याय पुढे आला आहे. या संदर्भात सल्लागार कंपनीने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) त्याचा आराखडा सादर केला आहे. हा मार्ग सहापदरी असून शहराच्या तीन भागांत तीन ठिकाणच्या रस्त्यांना तो जोडला जाणार आहे. तीन टप्प्यांत हा रस्ता प्रस्तावित आहे.