
Pune Traffic
Sakal
पुणे : शहरातील काही प्रमुख चौकांमधील वाहतूक नियंत्रक दिवा यंत्रणेतील वेळेबाबतचे आकडे (काऊंटडाऊन टायमर) तांत्रिक बिघाडामुळे बंद आहेत. त्यामुळे बहुतांश वाहनचालकांना ६० ते ९० सेकंदांहून अधिक काळ वाहने सुरूच ठेवून थांबावे लागते. परिणामी इंधनाचा अपव्यय आणि हवा प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे.